खेड (मंदार आपटे) : खेड येथील प्रांताधिकारीपदी वैशाली बाळासाहेब पाटील सोमवारी रुजू झाल्या आहेत. येथील प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असलेले शिवाजी जगताप यांची प्रशासकीय बदली उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी क्रमांक – ७, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे झाली असून त्याठिकाणी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
खेडमध्ये प्रांताधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या वैशाली पाटील ह्या उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) भूम , जिल्हा – धाराशिव येथे कार्यरत होत्या. तत्पूर्वी काही वर्षापूर्वी त्यांनी दापोली तहसीलदार पदाचा कार्यभार उत्तमरित्या सांभाळला होता.त्यामुळे त्या याठिकाणी नवख्या नसून त्यांना कोकण व येथील भौगोलिक परिस्थितीची चांगली जाण आहे.
त्यामुळे येथील जनतेला त्या योग्य प्रकारे निश्चितच न्याय देतील,असा विश्वास येथील जनतेने व्यक्त केला आहे.सोमवारी त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Read More: रत्नागिरी: आदमपूर येथे बेकायदा मटका जुगार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा