मंदार आपटे (प्रतिनिधी): आज दिनांक 12 रोजी शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन शासनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज खेड तालुक्यातील तुंबाड या गावी ही शिबिर उत्साह पार पडले.
संपूर्ण पंचक्रोशीतील गावांमध्ये लोकांना विविध दाखले त्वरित मिळावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये 60 ते 70 लोकांनी उत्पन्नाच्या दाखल्याचा त्वरित लाभ घेतला तसेच इतर अनेक शासनाच्या योजनांचा लाभार्थी या शिबिरातून झाल्याचे पाहायला मिळाले हे शिबिर तुंबाड गावांमध्ये श्रीकृष्ण मंदिरामध्ये आयोजित करण्यात आले होते.


शिबिर यशस्वी करण्यासाठी खेड चे प्रांत शिवाजी जगताप तसिलदार सुधीर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी राजाराम घुले रजवेल सुजित गायकवाड नवनाथ मोहिते सवणस गावचे गंगाधर तांबे श्रीधर पावसकर तारका तांबे त्या गावचे तलाठी मुंडे हिरालाल माळी प्रभाकर सोनवणे तसेच या तुंबाड गावचे सरपंच कदम,तसेच गावचे पोलीस पाटील सगळ्यांनीच विशेष मेहनत घेत हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला या शिबिरामध्ये नांदगावचे अरफात कादिरी ,कोरेगावचे संदेश साळुंखे ,जयश्री हुमणे ,आदींनी विशेष मेहनत घेतली तसेच यात संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंदार आपटे यांनी मानले.
