खेड-प्रतिनिधी:
खेड शहरात सध्या तहसिल कार्यलयात कामासाठी येणारया लोकांना 5 रु. स्टॅम्प तिकीटसाठी जादा पैसे मोजावे लागत आहे. महसुल कामी कागदी अर्जावर किवा स्टैंप पेपरवर लावण्यात येणारे 5 रु 10 रु. तिकीट (स्टॅम्प) चा प्रचंड प्रमाणात तुडवका होत आहे. यांचा फटका ग्रामीण मधुन येणारे ग्राहककांना बसत आहे.
नुकतेच १० व 12 वीचे निकाल लागले आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्याना जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेअर, उत्पनाचे दाखले,आदी दाखले आवशकता असते. तरी याकामी फॉर्मवर लावण्यासाठी 5 रु तिकीट आवश्कता असते. मात्र गेले चार –पाच दिवस खेड मधील परवाना धारक स्टैंप विक्रेते तिकीट उपलब्ध नाही असे सांगत असल्याने विद्यार्थि वर्गाला याचा फटका बसत आहे. काही वेळेला 5 चे तिकीट संपले असल्याने त्याएवजी 20 चे तिकीट लावा असा सल्ला परवाना धारकांकडून दिला जातो याचा सर्व फटका ग्रामीण मधुन आलेल्या लोकांना बसतो.
खेड शहरात चार ते पाच परवाने धारक विक्रेते आहेत. या विक्रेताना नक्की कोणाचे अभय आहे असा सवाल सामान्य नागरिक करतात तहसिलदार व शासकीय अधिकारी नक्की या गोष्टीकडे गांभीर्याने पाहतील का.. दापोली मतदार संघाचे आमदार योगेशदादा कदम महसुल, ग्रामीण पंचायतराज, असा मंत्री पदाची जबाबदारी असताना त्याच्या मतदारसंघात ग्रामीणमधील लोकांना पाच रु अर्जावर लागणारे तिकीट मिळत नाही ? असा सवाल ग्रामीण मधील नागरीक विचारतात की कोणाच्या आशिर्वादाने मुदाम पाच रु तिकीट न देता जास्त किमतीचे देवून परवानाधारक आपलाच फायदा बघत आहेत.
या साऱ्या गोष्ठीकडे परवाना धारकांना कोण पाठीशी घालत आहे. तहसीलदार प्रांत, जिल्हाधिकारी या प्रकरणाकडे लक्ष घालून हे प्रकार थांबवून खेड शहरात नागरिकांना न्याय मिळेल अशी माफक अपेक्षा नागरिक करीत आहे.