(मंदार आपटे) खेड: 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा होतो या निमित्त महसूल सप्ताह आयोजन करण्यात आले होते.खेड तालुक्यामधील अनेक ठिकाणी या सप्ताहाचे आयोजन करणे होते यावेळी कोरेगाव येथे धावजी बाबा मंदिरामध्ये अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखले जातीचे दाखले आवास योजनेसाठी कागदपत्रे आधी दाखल्यांचे मार्गदर्शन करण्यात आले.


हे शिबिर तहसीलदार सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी मंडळ अधिकारी राजाराम घुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येते असे त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी गावाच्या वतीने सर्व उपस्थित शासन अधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील मोरे,सरपंच मोरे मॅडम, यांच्यासह समीर जाधव आदी उपस्थित होते. तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हिरालाल माळी, आकाश बोराटे, प्रभाकर सोनवणे, सुजित गायकवाड, गंगाधर तांबे, नवनाथ मोहिते, तारका तांबे, मंदार आपटे, जयश्री हुमणे, कपिल तांबे,अरफात कादिरी, संदेश साळुखे आदी मान्यवर उपस्थित होते…