खेड (मंदार आपटे): खेड तालुक्यात पावसाने धुवाधार बॅटिंग चालू असताना वारंवार वीज खंडित होणे यात रोजचे झाले आहे महावितरणचा कामाचा फटका पंचक्रोशी मधील नांदगाव ,कोरेगाव, शिरशी, आमशेत, रजवेल ,सवणस, आधी गावांमध्ये विजेचा खेळ खंडोबा चालू आहे .
खरंतर 12 तासा पेक्षा जास्त वेळ ग्राहकाला अंधारात ठेवता येत नाही असा नियम असताना या पंचक्रोशी मध्ये गेले दोन दिवस ही लोक काळोखात आहेत ह्या पंचक्रोशीतील लोकांनी जर महावितरण कडे संपर्क साधला तर फोन न लागणे फोनवरती नीट न बोलणे असेही प्रकार अधिकाऱ्यांकडून होतात या सर्व गोष्टींचा फटका सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसतो खरंतर महावितरण च्या कर्मचाऱ्यांनी पावसा अगोदर विजे संदर्भातली बहुतांशीची काम पूर्ण केल्याचा तोंडी दावा अनेक वेळा ऐकायला मिळत होता मात्र हा दावा आता खोटा ठरल्याचे चित्र खाडीपत्त्यात पाहायला मिळत आहे.
खाडीपत्त्यात विद्यार्थी वयस्कर आजारी लोक यांना या सगळ्याचा फटका बसत आहे विशेष म्हणजे या खाडीपत्त्यामध्ये कोरेगाव येथे सरकारी दवाखाना आहे. शेतकरी शेतीची कामे करत असताना विंचू दंश करणे जीव जनावर चावणे असे सर्व प्रकार या खाडीपत्त्यात होतात अशा वेळेला जर प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेले तर वीज नसल्यामुळे त्या याचा मोठा फटका हा त्या सर्पद अंश किंवा जीव जनावर चावलेल्या व्यक्तीला बसतो.
खरंतर महावितरणचे ढोबळ कारभार याचा फटका नाहक ग्राहकाला बसत आहे खाडीपत्त्यामध्ये या बाबत त्रिव्र नाराजी व्यक्त होत आहे तरी स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार अनेक पक्षाचे युवा नेते यांनी लक्ष घालून गेले दोन दिवसापासून बंद असलेल्या गावांमध्ये लाईट नसल्याने तेथे त्वरित वीज चालू करावी तसेच अधिकाऱ्यांना समज देऊन कारभार कसा सुधारेल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सध्या या पंचक्रोशीतून जोर धरून जोर धरत आहे.
खेड महा ई-सेवा केंद्र तालुक्याच्या वतीने पाटील मॅडम यांचे स्वागत!