खेड (मंदार आपटे): खेड शहरात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे बाजारपेठेमध्ये व आजूबाजूच्या परिसरात पाणी आले आहे खेड मच्छी मार्केट आज सकाळी पाण्याखाली गेले आहे.
आज दुपारी तीन ते चार च्या दरम्यान खेड दापोली रोडवरील कन्याशाळेपर्यंत पाणी आले आहे तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे शहरातील व गावातील शाळा आज लवकर सोडण्यात आले आहे आज भरलेल्या पाण्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे लोकांनी घाबरू नये आणि शक्यतो आपल्या घराबाहेर पडू नये असे सूचना वारंवार शासनाकडून देण्यात येत आहेत.