खेड-(मंदार आपटे): ज्ञानदीप शाळेच्या पाठीमागे रस्त्यावरून विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय नुकताच कोकणात मुसळधार पाऊस पडत असताना अनेक भागात साकव वाहून गेलेत रस्ते खचलेत अशामध्येच भडगाव खोंडे शाळेच्या पाठीमागील रोडची ही अवस्था दयनीय झाली आहे चार चाकी वाहने या खड्ड्यांमध्ये अडकलेली पाहायला मिळतात रोज सकाळी या मार्गावरती छोटे-मोठे अपघात होतात याच मार्गावरून विद्यार्थी येजा करत असतात.
याच मार्गावरती एमबीए कॉलेज ज्ञानदीप विद्यामंदिर आयसीएस कॉलेज यांसारखी मोठी महाविद्यालय आहेत त्यामुळे या रस्त्यावरून विद्यार्थ्यांची ये जा मोठ्या प्रमाणावरती होते या गावांमधून कर्मचारी वर्ग याच रस्त्यावरून ये जा करत असतात गेल्या वर्षीच ज्ञानदीप शाळेच्या पालकांनी खेड नगरपालिकेवरती धडक मोर्चा दिला होता त्यानंतर अनेक जणांनी तोंडी सूचनाही देऊन बघितल्या तरी सुद्धा खेड नगरपरिषद व संबंधित ग्रामपंचायत या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याने पालक विद्यार्थी शाळेने नाराजी व्यक्त केली आहे.
खेड: महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत तुंबाड गावामध्ये शिबिराचे आयोजन