रत्नागिरी शहरातील आदमपूर भागात बेकायदेशीर मटका जुगार चालवणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई शनिवार, ५ जुलै रोजी दुपारी १२.३५ च्या सुमारास करण्यात आली.
प्रदीप प्रकाश रजपूत (वय ४०, रा. धनजी नाका, रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस हेडकॉन्स्टेबल अमोल भोसले यांनी तक्रार दिली होती.
तक्रारीनुसार, प्रदीप रजपूत हा आदमपूर येथे लोकांकडून पैसे घेऊन मटक्याचा जुगार चालवत होता. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १,५५७ रुपयांचा माल जप्त केला आहे.